कोल्हापुरात क्लासच्या बोर्डची तोडफोड 
कोल्हापूर

Kolhapur News : कोल्हापुरात क्लासच्या बोर्डची तोडफोड

घोषणाबाजी करत क्लासचे बोर्ड उखडून टाकले फाडून

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आरसीसी क्लासचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली. याचे पडसाद मंगळवारी कोल्हापुरात उमटले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोटेगावकर यांचा निषेध केला. व्हिनस कॉर्नर परिसरातील क्लासच्या सर्व बोर्डना काळे फासून ते बोर्ड फाडून टाकले.

शिवसेना शहरप्रमुख मंजित माने म्हणाले, मोटेगावकरसारख्या लोकांमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यांच्या संपत्ती कायमच्या सील केल्या पाहिजेत. पेपरफुटी सातत्याने होणे सरकारचे मोठे अपयश आहे. यावेळी जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, युवा सेना शहरप्रमुख सुमीत मेळवंकी, समन्व्यक अक्षय घाटगे, शुभम पाटील, ऋषी जोशी, तालुका प्रमुख योगेश लोहार, फिरोज मुल्लानी, कनिष्क शिंदे, मयुरेश भिर्डीकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, मोटेगावकर यांच्या शाहूपुरीतील बंद असलेल्या क्लासच्या ठिकाणी मंगळवारी दिवसभर पालकांची मोठी वर्दळ होती. काहीजण क्लास कधी उघडणार, याबाबत विचारणा करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT