हर्षवर्धन केदार यादव Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Youth Drowning | काळम्मावाडी येथील दुधगंगा नदीतील डोहात बुडून कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू

काळम्मावाडीजवळील नदीपात्रातील खोल डोहात पाण्याची खोली न लक्षात आल्याने पाण्यात बुडाला

पुढारी वृत्तसेवा

Dudhganga river accident

सरवडे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी प्रकल्पाच्या पूर्वेकडील दुधगंगा नदीपात्रातील काळोख्या डोहात बुडून कोल्हापूर येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षवर्धन केदार यादव (वय ३३, रा. मुक्त सैनिक हाऊसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते.

रविवारी (दि. १५) सकाळी सुमारे आठ ते नऊ मित्रांसह हर्षवर्धन काळम्मावाडी व राधानगरी परिसर पाहण्यासाठी आला होता. काळम्मावाडी गावाजवळील नदीपात्रातील खोल डोहात पाण्याची खोली न लक्षात आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी तात्काळ शोध घेऊन त्याला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर हर्षवर्धन यांचा मृतदेह राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांच्या आक्रोशाने परिसर हळहळला. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.

दरम्यान, काळम्मावाडी प्रकल्प परिसरातील धोकादायक ठिकाणी सुरक्षेचे फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT