प्रातिनिधीक फोटो File Photo
कोल्हापूर

कोल्‍हापूर : रानडूकराच्या हल्यात तरुण जखमी, वारणा कापशी येथील घटना

Kolhapur News | परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे पुढारी वृत्तसेवा :  वारणा कापशी ता शाहूवाडी येथे रानडूकराच्या हल्यात तरूण जखमी झाल्‍याची घटना घडली आहे. रामचंद्र नामदेव कदम वय ४० असे जखमी तरुणाचे नाव असून ही घटना कापशी मलकापूर रोडवर असणाऱ्या वारणा कॉलनी भागात घडली आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र कदम हे जनावरांसाठी ऊसाचे वाडे तोडत असतांना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या डुकराने कदम यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी मलकापूर रुग्णालयात दाखल केले आहे. सदर भागात या अगोदर दोन कुत्र्यांना रानडूकरानी ठार केले आहे. या घटनेमुळे लोकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT