तरुण हॉकी खेळाडूने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा 
कोल्हापूर

Kolhapur Crime : तरुण हॉकी खेळाडूने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

कसबा बावडा, रेणुकानगर येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कसबा बावडा, रेणुकानगर येथील शिवम कृष्णात पाटील (वय 23) या तरुण हॉकी खेळाडूने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही.

शिवम पुण्यात शिक्षण घेत होता. पंधरवड्यापुर्वी तो घराकडे आला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय, मित्रांशी गप्पा मारून तो खोलीत झोपण्यासाठी गेला. सकाळी लवकर न उठल्याने कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा ठोठावला; प्रतिसाद मिळाला नाही. नातेवाईकांनी दरवाजा उचकटून काढल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. बेशुद्ध अवस्थेत त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शिवमने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीय, नातेवाईकांसह मित्रांना धक्का बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT