कोल्हापूर : काळम्मावाडी पाणी योजनेंतर्गत पुईखडी फिल्टर हाऊस येथे नियमित देखभाल-दुरुस्तीचे काम गुरुवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामांतर्गत साळोखेनगरातील उंच टाकी येथील 1100 मि.मी. मुख्य गुरुत्व वाहिनीवरील व्हॉल्व्ह बसविण्याचे, जुने आपटेनगर उंच टाकीचे इनलेट व आऊटलेट कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्याचे काम होणार आहे. परिणामी, ए व बी वॉर्डमधील तसेच संलग्न उपनगरे व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवार, दि. 7 रोजी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होईल.
दरम्यान, ई वॉर्ड आणि बालिंगा योजनेवर आधारित सी व डी वॉर्डचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार शिंगणापूर येथून कसबा बावडा फिल्टरमार्फत कसबा बावडा, ताराबाई पार्क व कावळा नाका परिसराला पाणीपुरवठा केला जाईल. पाणीपुरवठा बंद राहणार्या प्रमुख भागांमध्ये पुईखडी परिसर, कलिकतेनगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटीलनगर, गंधर्वनगरी, कणेरकरनगर, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी परिसर, आपटेनगर, नवीन वाशी नाका, साळोखेनगर, जीवबानाना पार्क, संभाजीनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, महालक्ष्मीनगर, शेंडापार्क, आर.के. नगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, रायगड कॉलनी, नेहरूनगर, जवाहरनगर आणि संलग्न ग्रामीण भागांचा समावेश आहे.