कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या काळम्मावाडी 33 केव्ही विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनच्या ठिकाणी आयसोलेटर बसविण्याचे काम सोमवारी व मंगळवारी (दि. 9 व 10) केले जाणार आहे. त्यासाठी विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने काळम्मावाडी योजनेतून शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही; मात्र शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी या पंपिंग स्टेशनमधून पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे शहराला सोमवार व मंगळवारी अपुरा पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे.
शहरातील ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, क्रशरचौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब—म्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब परिसर व त्यास सलग्नित ग्रामीण भाग व उपनगरे.
ई वॉर्डअंतर्गत संपूर्ण कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्टेशन, राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, शास्त्रीनगर, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर, ग्रीनपार्क परिसर, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारपेठ आदी ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होणार नाही. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.