वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथील ग््राामपंचायतीच्या कामकाजात गेल्या तीन वर्षांपासून सरपंच व महिला सदस्यांच्या पतींचा प्रचंड हस्तक्षेप होत आहे. सभागृहाच्या प्रत्येक बैठकीत सरपंचांचे नातेवाईक उपस्थित असतात. बंद दाराआड नातेवाईकांच्या उपस्थितीत सभागृहात रोज काही विषयांवर खलबते सुरू असतात. नातेवाईकांच्या सभागृहातील या लुडबुडीमुळे अन्य सदस्यांमध्ये असंतोष आहे.
विद्यमान सभागृहाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, सभागृह अस्तित्वात आल्यापासून ग््राामपंचायत कामकाजात सरपंचांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप सुरू आहे. याबाबत काही सत्तारूढ व विरोधी सदस्य खासगीत बोलतात; पण नातेवाईकांच्या या हस्तक्षेपाला दबावामुळे उघडपणे कोणीही विरोध करीत नाही. ग््राामपंचायतीच्या कारभारात महिला सरपंच, तसेच महिला सदस्यांच्या पतीने किंवा अन्य नातेवाईकांनी हस्तक्षेप करू नये, असा शासन नियम आहे. मात्र, हा नियम धाब्यावर बसवून वडणगे ग््राामपंचायतीच्या सभागृहात सरपंच व अन्य सदस्यांच्या नातेवाईकांची दररोज ऊठबस असते. ग््राामपंचायतच्या प्रत्येक बैठकीला संबंधित नातेवाईक, तसेच सत्तारूढ गटाचे काही लोक सभागृहात उपस्थित असतात. बाहेरील लोकांच्या कामकाजातील या हस्तक्षेपामुळे निर्वाचित सदस्यांचे मत विचारात घेतले जात नाही. त्यामुळे ते या बैठकीकडे पाठ फिरवतात, अशी माहिती सदस्य ऋषीकेश ठाणेकर यांनी दिली.
ग््राामपंचायतीच्या कारभारात सुरुवातीपासूनच सरपंचांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप होत आहे. याबाबत यापूर्वी जिल्हा प्रशासन आणि ग््राामपंचायत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, यावर कोणतीच कारवाई झाली नाही. दिवसेंदिवस हस्तक्षेप वाढत आहे.- ऋषीकेश ठाणेकर, ग््राामपंचायत सदस्य