चंदगड : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) जवळील तिरमाळच्या शेतात गुरुवारी दुपारी अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात 16 बकऱ्यांचा मृत्यू झाला. यात सिद्धाराम यल्लाप्पा धनगर (मूळ गाव बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज, सध्या रा. राजगोळी खुर्द) यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
तिरमाळजवळील तुटून गेलेल्या उसाच्या मळ्यात बकरी जाळी लावून आत सोडली होती. यामध्ये लहान-मोठी सोळा बकरी होती. सिद्धराम कामानिमित्त परगावी गेले होते. यादरम्यान ही घटना घडली आहे. पाटणे वनक्षेत्रपाल शीतल पाटील, वनपाल जॉन्सन डिसोजा यांनी पथकासह सायंकाळी भेट दिली. घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे वनपाल जॉन्सन डिसोजा यांनी सांगितले.