पेटीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 
कोल्हापूर

कोल्हापूर : आंबा-मानोली जलाशयाच्या परिसरात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

backup backup

सरुड, पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील मानोली लघु पाटबंधारे धरणाच्या परिसरात बेवारस पत्र्याच्या पेटीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर मानोली धरण आहे. या धरणाच्या मागील बाजूस रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर बेवारस स्थितीत पडलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.

मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे असून साधारणपणे सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांने निर्जनस्थळी आणून टाकला असण्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे. माणुसकीचा गळा घोटणाऱ्या या घटनेने पोलिस अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र साळोखे, शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय पाटील या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पाहणी केली आहे. तपासाच्या दृष्टीने या वरिष्ठांनी पथकाला विशेष सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्याचा विश्वासही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्याची माहितीही पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT