कोल्हापूर

कोल्हापूर : धुमडेवाडी फाट्यावर दुचाकींची धडक; दोघे जागीच ठार

अविनाश सुतार

चंदगड : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी (ता. चंदगड) फाट्यावरील वळणावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या अपघातात निट्टूर येथील सुरेश रामू पाटील (वय ५०) आणि सदारवाडी येथील भगवान आनंद सदावर (वय ३८) यांचा मृत्यू झाला.

सुरेश पाटील दौलत साखर कारखान्याकडे उसाचा भरलेला ट्रॅक्टर नंबर लावून आपल्या निट्टूर या गावी जात होते. दरम्यान पाटणे फाटा येथून सदारवाडीकडे जाणाऱ्या भगवान यांच्या दुचाकीची समारोसमोर जोरात धडक बसली. यामध्ये दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. तर दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पुढील तपास अमोल पाटील करत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT