Kolhapur Firing Incident | कोल्हापूरचा बिहार... दिवसाढवळ्या गोळीबाराने हादरतोय जिल्हा ! 
कोल्हापूर

Kolhapur Firing Incident | कोल्हापूरचा बिहार... दिवसाढवळ्या गोळीबाराने हादरतोय जिल्हा !

राजकीय वरदहस्तामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले; परिसरातील नागरिक भयभीत

पुढारी वृत्तसेवा

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : किरकोळ वादातून चाकू हल्ला, तलवार हल्ल्याच्या घटना जिल्ह्यात मागे पडू लागल्या असून थेट पिस्तूल रोखण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे कोल्हापूरची स्थिती बिहारसारखी होतेय कि काय? खेळण्यातील बंदूकीप्रमाणे उपलब्ध होणाऱ्या शस्त्रांमुळे गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

शस्त्र तस्करीचे आंतरराज्यीय कनेक्शन

कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात यापूर्वी शस्त्र तस्करीच्या उलाढाली होत्या, आता तस्करीचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. अनेक शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये तरुण अडकले आहेत. जिल्ह्यातील काही तस्करांचे कनेक्शन मध्य प्रदेश, बिहारसह राजस्थानपर्यंत असल्याचे समोर आले. पिस्तूल, रिव्हॉल्वर, बंदुकीची तस्करी ट्रक, मालवाहतूक गाड्यांमधून होते. कार वेळा शस्त्रतस्कर स्वतः दुचाकीवरून तस्करी करतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानातून बांधकाम व्यवसायासाठी येणारे कामगारही यामध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील गोळीबाराच्या प्रमुख घटना

* अशोक पाटील खून प्रकरण महाद्वार रोड २०१७

* रमणमळा पोस्ट ऑफिस चौकात गायकवाड गोळीबार प्रकरण

* बालिंगा येथे गोळीबार करून दरोडा (जुलै २०२४)

* बिद्री येथे स्क्रॅप व्यवसायातील वर्चस्ववादातून गोळीबार

* तरुणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी आर. के. नगर येथे तरुणाने रोखली बंदूक (२०२५)

* गणेशोत्सवात मंडळाच्या वादातून बारा बोअरची बंदूक रोखली (२०२५)

* दारु पिताना झालेल्या वादातून हवेत गोळीबार शिये २०२५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT