बालिंगा : शिंगणापूर (ता. करवीर) येथील पंचगंगा नदीवर असलेल्या शिंगणापूर बंधाऱ्यावर वडिलांसोबत गेलेल्या मानस गणेश कांबळे (वय 4) या बालकाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कांबळे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. मानस हा नदीकाठी असलेल्या पायऱ्यांच्या कठड्यावर भावंडांसोबत खेळत होता. गणेश नदीपात्रातून बाहेर आल्यावर मुलगा मानस न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच उपस्थितांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास माहिती दिली. अथक शोधमोहिमेनंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मृतदेह शोधण्यात जवानांना यश आले.
या मोहिमेत कृष्णात सोरटे, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, प्रथमेश येरुडकर, आदिनाथ कांबळे आदी सहभागी झाले.