गौरी-गणपती विसर्जन 
कोल्हापूर

कोल्हापूर : गौरी-गणपती विसर्जनासाठी वाहतूक मार्गांत आज बदल

काही मार्ग बंद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर शहरातील वाहतूक मार्गात गुरुवारी (दि. 12) रोजी बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग बंद, तर काही खुले केले आहेत.

पंचगंगा घाट परिसर विसर्जन स्थळ

प्रवेश बंद केलेले मार्ग :- (अत्यावश्यक सेवेतील वाहने व

गणेशमूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जनासाठी किंवा दान करण्यास

आलेल्या मोटार वाहनांना वगळून)

1) गंगावेश चौक, पंचगंगा घाट, शिवाजी पूल या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

2) तोरस्कर चौक, पंचगंगा घाट, गंगावेश चौक या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

इराणी खण विसर्जन स्थळ

1) संभाजीनगर कडून क्रशर चौकाकडे जाणार्‍या अवजड वाहनांना संभाजीनगर चौक या ठिकाणी प्रवेश बंद. सदर वाहने संभाजीनगर ते कळंबा ते नवीन वाशी नाका मार्गे सोयीनुसार पुढे मार्गस्त होतील.

2) फुलेवाडी मार्गे शहरात येणार्‍या अवजड वाहनांना फुलेवाडी नाका या ठिकाणी प्रवेश बंद. सदर वाहने फुलेवाडी रिंगरोड ते नवीन वाशी नाका ते कळंबा ते संभाजीनगर मार्गे सोयीनुसार पुढे मार्गस्त होतील.

राजाराम बंधारा विसर्जन स्थळ

1) कसबा बावडा मुख्य मार्गावरून एस.आर.पी.एफ. कॅम्पकडून नदीकडे जाणार्‍या सर्व वाहनांना एस. आर.पी.एफ. कॅम्प येथे प्रवेश बंद.

2) कसबा बावडा पिंजार गल्ली ते राजाराम बंधार्‍याकडे जाणार्‍या सर्व वाहनांना पिंजार गल्लीच्या प्रवेश ठिकाणी प्रवेश बंद.

कोटीतीर्थ तलाव विसर्जन स्थळ

1) शाहूमिल चौकाकडून पंत वालावलकर हॉस्पिटल चौकाकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना शाहूमिल चौक या ठिकाणी प्रवेश बंद.

3) ए वन फोटो स्टुडिओकडून कोटीतीर्थकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना जय राज पेट्रोलपंप या ठिकाणी प्रवेश बंद.

राजाराम तलाव विसर्जन स्थळ

1) शिवाजी विद्यापीठ समोरुन सरनोबतवाडीकडे जाणार्‍या-येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

पार्किंग ठिकाणे

1) रावजी मंगल कार्यालयासमोर

2) संभाजीनगर एस.टी. स्टॅन्ड

3) राजकपुर पुतळा ते देवकर पेट्रोल पंप रंकाळ्याकडील बाजूस सिंगल पार्किंग

4) देवकर पाणंद पेट्रोल पंपासमोरील रिकामी जागा

5) पंचगंगा परिसरात कृत्रिम कुंडात विसर्जनाकरिता येणारी सर्व वाहने ब—ह्मपुरी टेकडी येथे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT