शौर्य निगडे  
कोल्हापूर

कोल्हापूर : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार

आंबवडे येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील आंबवडे येथे भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शौर्य रवींद्र निगडे (रा. आंबवडे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला.

दरम्यान, या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक शिवाजी रवींद्र थोरात (वय 25, रा. बीड) यास पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शौर्य हा सायकलने सायंकाळी घरी जात होता. शिवाजी थोरात या चालकाने ट्रॅक्टर ट्रॉलीसह बेदरकारपणे चालवून मागून त्याला जोराची धडक दिली. या धडकेत शौर्य गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT