टोल नाक्यावरील शेड हटविले; मात्र जीवघेणे स्पीड ब्रेकर कायम 
कोल्हापूर

Kolhapur News : टोल नाक्यावरील शेड हटविले; मात्र जीवघेणे स्पीड ब्रेकर कायम

महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाहनांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेने शहरातील टोल नाक्यांवरील टोल शेड काढले आहेत; मात्र त्या ठिकाणी असलेले अर्धवट आणि खराब झालेले स्पीड ब्रेकर अद्याप तसेच असल्याने वाहनचालकांसाठी ते धोकादायक ठरत आहेत. तुटलेल्या व अर्धवट स्पीड ब्रेकरमुळे वाहनधारकांना जोरदार धक्के बसत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे स्पीड ब्रेकर धोकादायक ठरत आहेत.

महापालिकेने टोल शेड हटवून मार्ग मोकळा केला असला, तरी रस्त्यावरील अर्धवट स्पीड ब्रेकर तातडीने काढून रस्ता समतल करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT