Kolhapur water supply | कोल्हापुरात उद्यापासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद file photo
कोल्हापूर

Kolhapur water supply | कोल्हापुरात उद्यापासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा ते चंबुखडी येथील ७०० मि. मी. व्यासाच्या रायझिंग मेन पाईपलाईनवरील मोठ्या गळतीची दुरुस्ती बुधवारी व गुरुवारी (दि. ९ व १०) केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. ११) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

ए व बी वॉर्डसह संलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, राजे संभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड व मंगळवार पेठेतील काही भाग.

संपूर्ण सी व डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, अंबाबाई मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब तसेच संलग्न ग्रामीण भाग व उपनगरे. ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरीतील ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक आदी परिसरातही दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT