Kolhapur Temperature Rise | कोल्हापूरचे तापमान वाढले; राज्यात ठरताेय ‘हॉट’ स्पॉट File Photo
कोल्हापूर

Kolhapur Temperature Rise | कोल्हापूरचे तापमान वाढले; राज्यात ठरताेय ‘हॉट’ स्पॉट

उष्ण दिवसांची संख्या दुप्पट; ‘सीईईडब्ल्यू’च्या अहवालातून धक्कादायक माहिती

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : ‘अरे, कोल्हापुरात पूर्वी एवढा उकाडा जाणवत नव्हता ना! पण आज बघ, किती उकडतंय…’ कोल्हापुरात वावरताना नागरिकांच्या तोंडी सहज ऐकू येणारी ही प्रतिक्रिया आता हवामान बदलाच्या वाढत्या संकटाचा गंभीर इशारा ठरत आहे. राज्यात दिवसा सरासरी तापमानवाढीचा सर्वाधिक वेग कोल्हापुरात नोंदविण्यात आला. गेल्या चार दशकांत जिल्ह्यातील उष्ण दिवसांची संख्या दुप्पट झाली आहे. २०३० ते २०५० या कालावधीत वर्षाला सरासरी २३ उष्ण दिवस राहण्याची शक्यता ‘कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्न्मेंट अँड वॉटर’ (सीईईडब्ल्यू) च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे राज्यात कोल्हापूर तापमानवाढीचा हॉटस्पॉट ठरत आहे.

तापमानवाढीची ही धक्कादायक स्थिती पाहता हवामान बदलाचे संकट कोल्हापूरच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (एमआयटीआरए), महाराष्ट्र शासन आणि सीईईडब्ल्यू यांच्या अहवालानुसार कोल्हापुरात १९८१ ते २०१० या कालावधीत वर्षाला सरासरी १२ उष्ण दिवसांची नोंद होत होती. मात्र, २०११ ते २०२४ या कालावधीत ही संख्या वाढून वर्षाला सरासरी २४ दिवसांवर पोहोचली आहे. म्हणजेच चार दशकांत जिल्ह्यातील उष्ण दिवसांची संख्या दुप्पट झाली आहे.

हवामान प्रारूपांच्या अंदाजानुसार, २०५० ते २०७० या कालावधीत उष्ण दिवसांची संख्या तिपटीने वाढून वर्षाला सरासरी ३८ दिवसांपर्यंत पोहोचू शकते. कोल्हापूर शहरातील दिशाहीन शहरीकरणामुळे उष्णतेचा धोका वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

असे वाढलेत उष्ण दिवस

१२ दिवस : १९८१ ते २०१० मधील वार्षिक सरासरी उष्ण दिवस.

२४ दिवस : २०११ ते २०२४ मधील वार्षिक सरासरी उष्ण दिवस.

२३ दिवस : २०३० ते २०५० साठीचा वार्षिक सरासरी अंदाज.

३८ दिवस : २०५०-२०७० साठीचा वार्षिक सरासरी अंदाज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT