Temperature  pudhari
कोल्हापूर

Kolhapur Temperature | कोल्हापुरात तब्बल १५ वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये पारा ३४.९ वर

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असल्याने कोल्हापुरात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कमालीचा उकाडा जाणवत आहे. सोमवारी कमाल तापमानाने ४.२ अंशांची उसळी घेत पारा ३४.९ अंशांवर पोहोचला. गेल्या तब्बल १५ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील हे तापमान उच्चांकी ठरले आहे. विशेष म्हणजे, २०१५ मध्ये एल निनोचा प्रभाव होता त्यावेळी ३४.६ अंशांचा टप्पा गाठण्यासाठी १७ ऑक्टोबर उजाडला होता. यंदा मात्र ऑक्टोबरच्या १२ व्या दिवशीच ‘ऑक्टोबर हीट’ने कहर केला आहे. रणणते ऊन व उकाड्यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

गेल्या १५ वर्षांच्या तापमानाच्या नोंदी पाहता ऑक्टोबरमध्ये ३४ अंशांच्या पुढे कमाल तापमान जाण्याच्या घटना मोजक्याच आहेत. २०१५ मध्ये ३४.६, २०१८ मध्ये ३४.१ आणि २०२६ मध्ये सर्वोच्च ३४.९ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे. ही १५ वर्षांतील सर्वोच्च नोंद आहे. तर, १५ ऑक्टोबर १९९६ ला कोल्हापुरात ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च ३६.५ अंश तापमानाची नोंद झाली होती.

शहरातील रात्रीही तापल्या

१९७२ पासूनच्या सर्वोच्च किमान तापमानात यंदाच्या तीन नोंदी

२४.१ : ३ ऑक्टोबर २०२६

२४.० : ५ ऑक्टोबर २०२६

२३.६ : २ ऑक्टोबर २०२६

यामुळे वाढतोय हीटचा तडाखा

* पाऊस थांबल्याने ढगांचे प्रमाण घटून सूर्यकिरणांचा जमिनीवर थेट मारा

* राजस्थानकडून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे आर्द्रता घटून वातावरण तापत आहे

* कोरडे वारे व हवामानातील बदलांमुळे ‘ऑक्टोबर हीट’ तीव्र होण्याची शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT