कोल्हापूर/पुणे : राज्यातील नागपूर, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांच्या तापमानाचा पारा रविवारी वाढला. कोल्हापूरचे तापमान दुपारी 3 च्या सुमारास 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान विदर्भात नोंदविले गेले.
काही जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले. वळवाने बे्रक घेतल्यानंतर राज्यात पुन्हा तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमानाचा पारा 42 अंशांवर सरकला होता. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला शहरात 43.2 अंश सेल्सिअस इतकी नोेंदवली गेली. वळवाच्या पावसामुळे गेल्या आठवड्यात तापमानात तब्बल सहा ते आठ अंश सेल्सिअसने घट झाली. मात्र, वळवाने विश्रांती घेतल्यानंतर आता तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.