file photo 
कोल्हापूर

कोल्हापूर : तंटामुक्त उपाध्यक्ष, मुलांचा महिला सदस्यांच्या घरावर हल्ला

मोहन कारंडे

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा : महिलादिनीच तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्ष व मुलांनी ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय महिला सदस्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्लात सदस्यासह पती, मुलास घरात घुसून जोरदार मारहाण केली. ग्रामपंचायतीने छापलेल्या जाहिरातीत महिला सदस्याच्या नावातील चुकीतून ही घटना घडली.

नागाव (ता. हातकणंगले) येथील जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत या महिला सदस्याच्या नावापुढे तिच्या पतीऐवजी तिच्या मृत दिराचे नाव छापले होते. ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नाव छापले गेले. ही पत्रिका गावातील व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर नावात खाडाखोड करत फिरत असल्याने महिला सदस्याच्या पतीने संबंधित व्यक्तीस विचारणा केली. पण त्याने चुकून हा प्रकार घडला आहे. असे सांगितले. पण व्हॉटस्अप ग्रुपवर मात्र ही चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे गावात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले. या चर्चेचे रूपांतर घरात घुसून मारहाणीपर्यंत गेले.

तंटामुक्त समिती उपाध्यक्ष व ही महिला सदस्य एकमेकांच्या शेजारीच राहात असल्याने उपाध्यक्षाने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन महिला सदस्यासह पती व मुलास मारहाण केली. यात पती व मुलगा जखमी झाले आहेत. महिला दिनीच महिलेचा आदर करण्याऐवजी घरात घुसून हल्ला करत महिलांसह पती व मुलास झालेली मारहाण ही कायद्याची पायमल्ली करणारी घटना ठरली आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT