टाकवडे येथे महिलांवर रंगफेक करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime | टाकवडे येथे महिलांवर रंगफेक व शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला जमावाचा चोप

शिरढोण–टाकवडे मार्गावरून दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांवर रंग फेकत अर्वाच्य शिवीगाळ

पुढारी वृत्तसेवा

Man beaten by mob Takwade Kolhapur

शिरढोण : शिरढोण–टाकवडे मार्गावरून दुचाकीवरून जात असताना महिलांवर रंग फेकत अर्वाच्य शिवीगाळ करून हुल्लडबाजी करणाऱ्या इचलकरंजीतील एका तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास टाकवडे येथील शाहू चौकात घडली. मात्र नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेत संबंधित तरुणाने तेथून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरढोणहून इचलकरंजीकडे दुचाकीवरून जात असलेले तिघे तरुण रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांवर रंगफेक करत तसेच शिवीगाळ करत हुल्लडबाजी करत होते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व दुचाकीस्वार संतप्त झाले. काही नागरिकांनी या तिघांना टाकवडे येथे अडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीची चाहूल लागताच त्यांपैकी दोघेजण तेथून पळून गेले; मात्र एक तरुण नागरिकांच्या हाती लागला.

यानंतर संतप्त जमावाने त्याला शाहू चौकात चांगलाच धडा शिकवत मारहाण केली. नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी केली; मात्र संधी साधून तो तेथून पसार झाला. दरम्यान, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर गावात उशिरापर्यंत सुरू असलेल्या काही तरुणांच्या धिंगाण्यावरही पोलिसांनी आळा घालत मोठ्या आवाजात लावलेले स्पीकर बंद करण्यास भाग पाडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT