कोल्हापूर : शहर, उपनगरांसह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या जीवघेण्या दहशतीमुळे नागरिकांत अनुरक्षिततेचे सावट आहे. मोकाट कुत्र्यांच्या झुंडीकडून होणारा पाठलाग धोकादायक ठरत आहे. शहर, जिल्ह्यात २०२४, २०२५ व जुलै २०२६ पर्यंत कुत्र्याच्या हल्ल्यात २ लाख ३१ हजार ६२९ निष्पाप जखमी झाले आहेत. चार वर्षांत १३ जणांना जीवाला नुकावे लागले आहे. मोकाट, भटक्या कुत्र्यांची फैलावणारी वहशत जीवघेणी ठरत आहे.
७ महिन्यांत ५० हजार ९५१ नागरिकांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला
जानेवारी ते जुलै २०२६ काळात शहर, उपनगरांसह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात शाळकरी मुलांसह ५० हजार ९५१ नागरिक जखमी झाले आहेत. सात महिन्यांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे : जानेवारी (८३५३), फेब्रुवारी (७५८१) मार्च (७५९४), एप्रिल (७६३२), मे (७०३१), जून (६५५७), जुलै (६२०३)
४ वर्षांत १३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आणि रेबिजचा संसर्ग होऊन चार वर्षांत १३ निष्पापांचा मृत्यू झाला आहे. २०२३ मध्ये ३, २०२४ मध्ये ७, २०२५ मध्ये १, तर जुलै २०२६ अखेर २ रुग्ण जीवाला मुकले आहेत.