कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षीय वरद रवींद्र पाटील या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुष खून केल्याप्रकरणी सोनाळी (ता. कागल) येथील दत्तात्रेय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४६ ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी मंगळवारी (दि. २५) दोषी ठरविले. त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
१७ ऑगस्ट २०२१ मध्ये घडलेल्या या घटनेने कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. तत्कालीन पोलीस उपाधीक्षक आर. आर. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. सरकारतर्फे या खटल्यात प्रधान जिल्हा सरकार वकील विवेक शुक्ल , विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले होते.