पुलाची शिरोली : कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीला विरोध करण्यासाठी मंगळवार दिनांक १७ रोजी ठीक सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय हद्दवाढीस विरोध करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत हद्द वाढी विरुद्धची योग्य ती दिशा ठरविण्यात येणार आहे.दरम्यान मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत गाव बंद राहणार आहे.
या बंद मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच पद्मजा करपे,उपसरपंच बाजीराव पाटील, सर्व सदस्य व कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समिती तर्फे करण्यात आले आहे.