Kolhapur Industrial Accident 
कोल्हापूर

Kolhapur Industrial Accident : शिरोली एमआयडीसीत भट्टीचा स्फोट; कामगार ठार

स्फोटानंतर हादरला परिसर

पुढारी वृत्तसेवा

नागाव/पुलाची शिरोली : शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यामध्ये हीट ट्रिटमेंटच्या भट्टीचा स्फोट होऊन राहुल मुकुंद कांबळे (वय 38, रा. इंगरूळ, ता. बत्तीस शिराळा, जि. सांगली) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

याबाबत माहिती अशी, राहुल कांबळे हा युवक शिरोली औद्योगिक वसाहतीतील श्रीराम इंडस्ट्रीजमध्ये सहा वर्षांपासून काम करत होता. मंगळवारी तो व अन्य तीन कामगार कंपनीत काम करत असताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. याच दरम्यान हीट ट्रिटमेंटच्या भट्टीचा अचानक स्फोट झाल्याने राहुल जागीच ठार झाला. स्फोटानंतर मोठा आवाज होऊन परिसर हादरून गेला. या घटनेची माहिती समजताच कंपनीचे मालक तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी याची माहिती शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात कळविली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात पाठवला. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT