कोल्हापूर

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यात गतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचार! संशयित ५२ वर्षीय आरोपी फरार

backup backup

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय गतिमंद युवतीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी ५५ वर्षीय नराधमाविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने संशयित भोपळे याच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पती, मुलगा, पीडित मुलगी, सासू अशा कुटुंबासह राहत होती. संशयित आरोपीचा मटण विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, संशयित आरोपी सोबत पीडितेच्या मुलीच्या कुटुंबाच्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. पीडित युवतीशी सहा महिन्यापासून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे पीडित युवती गर्भवती राहिली. दरम्यान या घटनेची उकल होताच याचा जाब विचारणाऱ्या फिर्यादी महिलेला संशयित आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची भाषा वापरून 'आपला या प्रकरणात काही एक संबंध नाही' असा पवित्रा घेतला. त्यातूनही दबाव वाढतोय हे ओळखून संशयित आरोपीने मुलीचा गर्भपात करून घेण्याचा अमानवी सल्ला देत या घटनेची बाहेर वाच्यता केल्यास फिर्यादी महिला व तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. अशी फिर्याद पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी आरोपीला अद्यापही अटक केलेली नाही. पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मलकापूर शहरात घडलेल्या या घटनेवरून शहर वासीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संशयित आरोपी हा सधन व्यावसायिक आहे. एका गरीब कुटुंबातील तेही गतिमंद मुलीवरील अत्याचाराची घटना उघडकीस येऊनही सामाजिक सेवेचा बुरखा पांघरणारे घटक अद्यापही गप्प कसे ? अत्याचार पीडित गरीब मुलीला व तीच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सामाजिक दाबावाची गरज का बर भासावी? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

डीवायएसपी यांची भेट…

शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पीडितेच्या कुटुंबाकडे घटनेची चौकशी केली. घटनेचा पंचनामा व अधिक माहिती घेत स्थानिक पोलिसांना तपासाच्या विशेष सूचनाही दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT