सरवडेत पार्किंग केलेल्या २ कारला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. Pudhari Photo
कोल्हापूर

सरवडेत पार्किंग केलेल्या २ कारला अज्ञात वाहनाची धडक; मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ

Kolhapur Accident News | वाहनांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

सरवडे: पुढारी वृत्तसेवा : निपाणी -फोंडा राज्यमार्गावरील सरवडे येथे घरासमोर पार्क केलेल्या दोन वाहनांना मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेत (एम ४ -१९ बीके ९०५९) अल्टो कार व (एम एच ०९ एफजे २४४४) स्विफ्ट या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात केली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याने प्रत्यक्षदर्शी कोणताही साक्षीदार उपलब्ध नाही. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. वाहनांचे मालक संजय कृष्णा एकल आणि युवराज कृष्णा एकल यांनी अपघाताची माहिती मिळाल्यावर तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

घटनास्थळी आढळलेल्या टायरच्या खुणा व तुटलेल्या भागांवरून अज्ञात वाहन हे मोठ्या वेगाने असावे आणि त्याने ही धडक दिली असावी, असा स्थानिक नागरिकांचा अंदाज आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे निपाणी-फोडा रस्त्यावर वाहतुकीसाठी योग्य नियमांची अंमलबजावणी आणि पार्किंगच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करण्यावर बंधने आणावीत व अपघात रोखण्यासाठी अधिक प्रकाशझोत व संकेतस्थळे बसवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

राधानगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, या अपघातास जबाबदार वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच तपासाचे निष्कर्ष हाती येतील, असे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT