सडोलीच्या मद्यधुंद युवा नेत्याची राशिवडेत धुलाई केली. File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : सडोलीच्या मद्यधुंद युवा नेत्याची राशिवडेत धुलाई

भर बाजारपेठेत दुचाकीला ठोकरले

पुढारी वृत्तसेवा

राशिवडे : प्रचार दौर्‍यावर असूनही मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सडोली खालसा (ता. करवीर) येथील एका युवा नेत्याची राशिवडे गावातील युवकांनी यथेच्छ धुलाई केली. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रचार सभेसाठी आलेल्या या युवा नेत्याने मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकलला जोरात ठोकर दिली. सुदैवाने या अपघातातून एक लहान मुलगी आश्चर्यकारकरीत्या बचावली. राशिवडेत भर बाजारपेठेत मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी एका पॅनेलच्या प्रचार दौर्‍यासाठी हा युवक नेता चारचाकी गाडीतून राशिवडे गावात येण्यापूर्वीच ‘टाईट’ झाला होता. येळवडे गावाकडून येताना राशिवडे बाजारपेठेत एका गिफ्ट दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकीला त्याने जोरात ठोकरले. त्यामुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणूनच एक लहान मुलगी या अपघातातून आश्चर्यकारक बचावली. याबाबत राधानगरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT