रुई येथे चालत्या दुचाकीला आग; चालक गंभीर जखमी 
कोल्हापूर

Kolhapur News| रुई येथे चालत्या दुचाकीला आग; चालक गंभीर जखमी

रुई-पट्टणकोडोली रस्त्यावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : रुई (ता. हातकणंगले) येथे चालत्या मोटारसायकलला अचानक लागलेल्या आगीत मोटारसायकल जळून खाक झाली, तर चालक राजू रंगराव शिंदे (रा. भोनेमाळ, इचलकरंजी) गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

रुई-पट्टणकोडोली रस्त्यावरून राजू शिंदे मोटारसायकलवरून जात होते. मगदूम विहिरीजवळ त्यांच्या गाडीला अचानक आग लागली. यावेळी ते गाडीवरून जोरात पडले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलिस पाटील नितीश तराळ, सुभाष चौगुले, जावेद मुजावर आणि नजीर मुजावर यांनी मदतकार्य केले. मोटारसायकलला आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT