Vehicle Passing  
कोल्हापूर

Kolhapur News| वाहन पासिंगचा घोळ; चोर सोडून संन्‍याशाला फाशी

राज्‍यातील २५० मोटार वाहन निरीक्षकांना ‘शो कॉज’ नोटीस

पुढारी वृत्तसेवा

सुनील सकटे

कोल्‍हापूर : प्रादेशिक परिवहन विभागातील अनेक किस्‍से चर्चेत असताना आता वाहन पासिंगचा घोळ समोर आला आहे. इतर राज्‍यांतील वाहनांच्‍या पासिंगमध्‍ये हेराफेरीचा प्रकार झाल्‍याचा संशय असून या विभागात राज्‍यातील सुमारे २५० मोटार वाहन निरीक्षकांना ‘शो कॉज’ नोटीस पाठविल्‍याने खळबळ उडाली आहे; मात्र या प्रकारात चोर सोडून संन्‍याशाला फाशी देण्‍याचा प्रकार असल्‍याची कुजबुज सुरू आहे.

राज्‍यातील प्रत्‍येक प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्‍याचे अधिकार मोटार वाहन निरीक्षकांना आहेत. देशभरात एकच कायदा असल्‍याने प्रत्‍येक राज्‍यातील मोटर वाहन निरीक्षकांना असे अधिकार आहेत; मात्र काही राज्‍यांत महसूल विभागाकडे ही जबाबदारी असते. त्‍या राज्‍यातील महसूल विभागाचे अधिकारी मोटार वाहन निरीक्षकांची शैक्षणिक पात्रता असणारे अधिकारी नेमून वाहनांचे पासिंग केले जाते.

इतर राज्‍यांतील मालवाहू व प्रवाशी वाहनांचे पासिंग करताना संबंधित अधिकारी वाहनांची तपासणी करून ३८ ए हे प्रमाणपत्र देतात. त्‍या प्रमाणपत्राच्‍या आधारे संबंधित वाहनधारक आपले वाहन ज्‍या ठिकाणी नोंद आहे. तेथे

वाहन फिटनेस प्रमाणपत्र घेतात.

मात्र, या प्रक्रियेत अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्‍याचे समजते. विशेषत: पनवेल, मुंबई, पुणे आणि ठाणे या क्षेत्रात असे प्रकार जास्‍त असल्‍याची चर्चा आहे; मात्र सब घोडे बारा टक्‍के या उक्‍तीप्रमाणे परिवहन विभागाने राज्‍यातील ३७५ मोटार वाहन निरीक्षकांपैकी तब्‍बल २५० मोटार वाहन निरीक्षकांना शो कॉज नोटिसा बजावल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT