Construction Sector 
कोल्हापूर

kolhapur News : रेडीरेकनर दर स्थिर निर्णयाचे बांधकाम क्षेत्राकडून स्वागत

दर वाढले असते तर व्यवसाय करणे झाले असते कठीण : बांधकाम व्यावसायिकांचे मत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्य शासनाने सन 2026-27 या वर्षासाठी ‌‘रेडीरेकनर‌’चे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बांधकाम साहित्याच्या दरवाढीने त्रस्त असलेल्या बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे, कोल्हापुरातील व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे सिमेंट, स्टील व इतर साहित्याचे दर वाढल्याने बांधकामाचा खर्च प्रति चौरस फूट सुमारे 200 रुपयांनी वाढला आहे. निवडणुकांमुळे परप्रांतीय कामगार विविध राज्यांत गेल्याने सध्या मजूर टंचाई आणि वाढीव मजुरीचा मोठा फटका बसत आहे. रेडीरेकनर वाढले असते तर लेबर सेस आणि इतर करांचा बोजा अधिक वाढला असता. क्रेडाईच्या 62 शहरांतील शाखांनी मुद्रांक विभाग आणि आमदारांना पत्रे देऊन हा दरवाढ रोखण्याची विनंती केली होती, जी शासनाने मान्य केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT