Highway Reopened Kolhapur Ratnagiri
कोल्हापूर : कासारी नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे केर्लीनजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग आज (दि.२२) सायंकाळी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर (NHAI) चे मुख्य प्रकल्प संचालक गोविंद बैरवा यांनी दिली.
दरम्यान, पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे केर्लीनजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग शिवाजी पूल येथे वाहतुकीसाठी आज सकाळी खुला करण्यात आला होता. केर्ले ते केर्ली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे हा मार्ग बंद होता. दरम्यान, आज सायंकाळी पाणी उतरल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. हा मार्ग खुला झाल्याने वाहन धारक आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.