जिल्ह्यांतर्गत पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur News | कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत 152 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

शेळके, जगताप, शहा यांची कोल्हापुरात नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : 18 पोलिस निरीक्षक, 38 सहायक निरीक्षक 96 उपनिरीक्षक अशा एकूण 152 अधिकार्‍यांच्या कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बदल्यांचे आदेश लागू केले आहेत. गडहिंग्लज पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांची सांगली, तर महेश इंगळे यांची सातारा येथे बदली झाली.

‘राजारामपुरी’चे निरीक्षक सतीश होडगर, हातकणंगले येथील निरीक्षक शरद म्हेमाणे यांची विनंती अमान्य करण्यात आली आहे. बदली झालेले निरीक्षक व कंसात बदलीचे ठिकाण : अजयकुमार सिंदकर (सांगली), अण्णा पवार (सातारा), हेमंतकुमार शहा (कोल्हापूर), संदीप जगताप (कोल्हापूर), महेश इंगळे (सातारा), जितेंद्र शहाणे (सांगली), शरद म्हेमाणे (अमान्य), दत्तात्रय देशमुख (सातारा), सतीश होडगर (अमान्य), अविनाश शिळीमकर (सातारा), वंदना श्रीसुंदर (पुणे ग्रामीण), अरुण देवकर (मुदतवाढ), मुकुंद कुलकर्णी (मुदतवाढ), किरण अवचर (मुदतवाढ), सुनील शेळके (कोल्हापूर), दादाभाऊ पवार (पुणे ग्रामीण), विजयसिंह चौहान (मुदतवाढ), महेश स्वामी (पुणे ग्रामीण) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT