bhudargad faye project
फये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला bhudargad faye project
कोल्हापूर

Kolhapur Rain|भूदरगड : फये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

पुढारी वृत्तसेवा
मिणचे खुर्द

भुदरगड तालुक्यातील फये लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस झाल्याने ३३.४२ मीटर उंची व ३५५.६५ मीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाची १३८.८८ दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक क्षमता आहे. प्रकल्पात पूर्ण पाणीसाठा झाला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Kolhapur Rain)

प्रकल्पांतर्गत ९७२ हेक्टर लाभक्षेत्र असून सिंचन क्षेत्र ७०० हेक्टर आहे. शेतीच्या पाण्यासाठी मोर ओहोळेवर बारा बंधारे बांधण्यात आलेले आहेत. प्रत्येक वर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. यावर्षी प्रकल्पात उशीरा पाणीसाठा करण्यात आला तसेच शेतीसाठी आवर्तने जादा देण्यात आली होती. त्यामुळे पाणीटंचाई भासली नव्हती. सध्या हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभक्षेत्रातील बळिराजा सुखावला आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

फये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून १०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

SCROLL FOR NEXT