पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या अभयारण्यामध्ये राज्यप्राणी शेकरूचे दर्शन झाले. राधानगरी आणि दाजीपूर हे अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक हे राधानगरी दाजीपूर अभयारण्यात विविध प्राणी पाहण्यासाठी दाखल होत आहे. यातीलच एका पर्यटकाला काळम्मावाडी येथे राज्यप्राणी शेकरूचे दर्शन झाले. विशेष म्हणजे शेकरू काहीतरी खाताना आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना सुद्धा दिसला. हा संपूर्ण व्हिडिओ पर्यटकाने आपल्या मोबाईल मध्ये कॅमेराबद्ध केला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या जंगलात शेकरू मोठ्या प्रमाणात आढळून येतो.