Kolhapur Monsoon Update
राधानगरी-निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक बंद  file photo
कोल्हापूर

Kolhapur Monsoon Update | वेदगंगा नदीला पूर; राधानगरी-निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक बंद

पुढारी वृत्तसेवा

मुदाळतिट्टा : सतत कोसळत असलेल्या दमदार मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. वेद गंगेच्या महापुराचे पाणी राधानगरी-निपाणी राज्यमार्गावर निढोरी-मुरगूड दरम्यान असणाऱ्या स्मशान शेडनजीक रस्त्यावर आले आहे. सध्या रस्त्यावर दीड फूट पाणी आल्याने येथून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वेदगंगा नदीला महापूर आल्याने नदीवरील वाघापूर, कुरणी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेले चार दिवस तेथून होणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. सध्या निढोरी-मुरगूड मार्गावर वाहतूक बंद असल्याने पर्यायी मुरगुड-चिमगाव- गंगापुर-मडिलगे-कुर या मार्गे गारगोटी-कोल्हापूर अशी वाहतूक सुरू आहे. निढोरी-कागल मार्गे वाहतुकीसाठी खुला आहे. मुरगुड निपाणी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुरगुड सेनापती कापशी मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. वेद गंगेचा महापूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुरगुड पोलिसांनी पुराच्या पाण्याच्या ठिकाणी बॅरिकेट उभे केले आहेत.

SCROLL FOR NEXT