Radhanagari road pothole Issues
गुडाळ : अतिवृष्टी आणि बांधकाम विभागाने रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष केल्यानेच राधानगरी तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाल्याची बातमी 31 ऑगस्ट रोजी 'दै. पुढारी' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या बातमीची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर आज (दि.३) सकाळी खिंडी व्हरवडे - भोगावती मार्गावर खड्डे भरण्यास प्रारंभ केला आहे.
तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागांच्या अखत्यारित एकूण 966 किमी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. उन्हाळ्यात 45 दिवस वाहतूक पूर्ण बंद ठेवून करण्यात आलेला फेजीवडे ते दाजीपूर दरम्यान चा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. पावसाळा संपेपर्यंत या रस्त्यांची किमान तात्पुरती डागडुजी आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दोन्ही राज्यमार्गांची आणि 180 कि. मि. लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्गांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.