पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव  Pudhari File Photo
कोल्हापूर

‌‘पुढारी‌’कार डॉ. ग. गो. जाधव स्मृतिदिनानिमित्त आज अभिवादन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘पुढारी‌’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (दि. 20) अभिवादन करण्यात येणार आहे. दै. ‌‘पुढारी‌’च्या भाऊसिंगजी रोडवरील ‌‘पुढारी भवन‌’ या मुख्य कार्यालयात यानिमित्त सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.

दैनिक ‌‘पुढारी‌’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्केटिंग रॅली काढण्यात येणार आहे. गगनबावडा येथे सकाळी गगनगडावरून प्रेरणा ज्योत आणली जाणार आहे. गगनबावडा ग््राामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप केले जाणार आहे. सायंकाळी डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT