प्रा. सौरभ जोशी  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime | कोल्हापुरात खळबळ : केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन

Sourabh Joshi FIR | प्रा. सौरभ जोशी याच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Gokul Shirgaon Police FIR Against Professor

कोल्हापूर : शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्राध्यापक सौरभ जोशी याच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक सौरभ जोशी हा वर्गातील विद्यार्थिनींना मुद्दाम टार्गेट करून त्यांना केबिनमध्ये बोलवत असे. केबिनमध्ये बोलावून संबंधित विद्यार्थिनींशी तो अश्लील पद्धतीने वर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे काही विद्यार्थिनींना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारीनुसार, सौरभ जोशीने केवळ एका विद्यार्थिनीशीच नव्हे तर सुमारे चार ते पाच विद्यार्थिनींशी अशा प्रकारचे गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनींपैकी एकीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

तक्रार दाखल होताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सौरभ जोशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

प्राध्यापक सौरभ जोशी याला तत्काळ निलंबित

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापक सौरभ जोशी याला तत्काळ निलंबित केले आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महाविद्यालयाकडून स्वतंत्र चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे.

अशा प्रकारच्या घटनांवर केवळ चौकशी पुरेशी नसून दोषीवर कठोर कारवाई होणेही तितकेच आवश्यक आहे, जेणेकरून शिक्षण संस्थांमधील विद्यार्थिनींची सुरक्षितता अबाधित राहील आणि पुन्हा कोणाचीही अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत होणार नाही.
- डॉ. मोहन वनरोट्टी, संस्था संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT