भाकरी, मसालेभात, तंबाखू, सिगारेट, लिंबू आदी साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | काँग्रेस, शिवसेना उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर भानामतीचा प्रकार; टोपसह परिसरात खळबळ

कासारवाडी फाटा ते जोतिबा रोडवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Black Magic in Election Campaign

टोप : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. या दरम्यान टोप येथे गुरुवारी रात्री एक वेगळाच व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे.

कासारवाडी फाटा ते जोतिबा रोडकडे जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर भानामतीचा संशयास्पद प्रकार आढळून आला. सदर ठिकाणी भाकरी, मसालेभात, तंबाखू, सिगारेट, लिंबू आदी साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या प्रकारामुळे परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांचा तीव्र निषेध होत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत या प्रकाराचा जाहीर निषेध केला. लोकशाही प्रक्रियेत अंधश्रद्धा व भीती पसरवणाऱ्या अशा कृत्यांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT