Police Suspension Pudhari
कोल्हापूर

Kolhapur police crime news | गुन्हा दाखल करण्यासाठी आर्थिक मागणी प्रकरणी अंमलदारावर निलंबनाची कारवाई

या प्रकरणी वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात सापडले असल्याचे समोर येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील एका गावात घडलेला गुन्हा दाखल करण्यासाठी अडीच लाख रुपयाची आर्थिक मागणी केल्याप्रकरणी भेडसगांव बिटचे अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या वृत्तास जिल्हा पोलीस प्रमख योगेश कुमार गुप्ता यांनी दुजोरा दिला आहे. तसेच या प्रकरणी वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात सापडले असल्याचे समोर येत आहे.

याबाबत माहिती अशी की, शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील एक गावात पंधरा दिवसापूर्वी एक गुन्हा घडला होता. तो दाखल करण्यास शाहूवाडी पोलीस टाळाटाळ करत होते तो दाखल करण्यासाठी पक्षकार पोलीस स्टेशनला येत होते. परंतु पोलीस अधिकारी आणि भेडसगांव बिटचे कर्मचारी दाद देत नव्हते. गुन्हा दाखल करण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी करण्यात येत होती. अखेर हा व्यवहार आडीच लाख रूपयास डिल झाला त्यांचे मोबाईल संभाषण रेकॉर्ड करण्यात आले.

याबाबत सदर घटनेतील पक्षकार यांनी सदर मोबाईल संभाषण पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांना सादर केले. शनिवारी (दि.१४) पोलीस प्रमुखांनी त्याची खात्री केली, त्यानुसार प्रथमदर्शनी एक अंमलदार दोषी अडळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तसेच सदर मोबाईल रेकॉर्डमध्ये सदर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ आधिकारी यांना पैसे द्यावे लागतात असे रेकॉर्ड आहे. त्यामुळे येथील वरिष्ठही चौंकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सदर प्रकरणाची शाहूवाडी तालुक्यात चर्चा सुरु असून या घटनेतून अन्य काही प्रकरणे उघडकिस येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT