सरवडे : पनोरी (ता.राधानगरी) येथील श्रीमंती हरी रेवडेकर (वय.७३ ) या वृध्देचा घराशेजारील विजय शंकर बरगे यांच्या गोबरगॅसमध्ये मृतदेह आढळला अंगावरील दागिने चोरीचा उद्देशाने घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून सदरच्या वृध्देच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याचे घटनास्थळावरुन समजते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरची वृध्दा ही एकटीच घरी रहात होत्या त्याना एक विवाहीत मुलगा व दोन विवाहीत मुली असून ते सर्वजण परगावी रहात असतात.रविवारी महिला एकटी असल्याने अज्ञात व्यक्तीने चोरीचा उद्देशाने सदर महिलेचा घातपात झाला असल्याचा घटनास्थळी नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.घटनेची फिर्याद मुलगा अमित रेवडेकर यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रणाली पोवार पोवार करत आहेत मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.