कोल्हापूर

Panhala Crocodile Rescued : सातवे तर्फ शिंदेवाडीत विहिरीतील पाच फुटी मगरीला वनविभागाकडून जीवदान

दोन तासांच्या थरारानंतर नैसर्गिक अधिवासात सुटका

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील सातवे तर्फ शिंदेवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या पाच फूट लांबीच्या मगरीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राबवलेली ही बचाव मोहीम तब्बल दोन तास चालली.

सातवे तर्फ शिंदेवाडी येथील संदिप शिंदे यांच्या विहिरीत मगर असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. विहिरीला कट्टा नसल्याने आणि खाली उतरण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. सुरुवातीला मोटर पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर वन्यजीव बचाव पथकाच्या सदस्यांनी रॅपलिंगच्या साहाय्याने विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाला मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने मगर त्यात रुतून बसली होती, मात्र पथकाने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर मगरीला सुखरूप बाहेर काढले.

न​मगरीला बाहेर काढल्यानंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ती पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. ही मोहीम उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ​या मोहिमेत पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी, वनपाल सागर पटकारे आणि वनरक्षक संदिप पाटील यांच्यासह वन्यजीव बचाव पथक करवीरचे प्रदिप सुतार व टीम तसेच पन्हाळा पथकाचे अजिंक्य बच्चे, किरण कुंभार, रोहित जाधव, अभिजीत पाटील आणि संभाजी चौगुले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT