Kolhapur: Water on Rajaram Dam
कोल्‍हापूर : राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ३३ फूट ६ इंचावर पोहोचली.  Pudhari Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : पंचगंगेची पाणी पातळी साडेआठ फुटांनी वाढली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात पावसाची संततधार सुरू असून आज (दि. १९) दिवसभर पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुले मागील २४ तासांत पाणी पातळी ८ फूट ६ इंचाने वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी २५ फूट इतकी होती. आज सायंकाळी ५ वाजता पाणीपातळी ३३ फूट ६ इंचावर पोहोचली.

SCROLL FOR NEXT