पाडळी बुद्रुक येथील सेवा संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील यांना अपात्र ठरविण्यात आले. Pudhari Photo
कोल्हापूर

पाडळी बुद्रुक येथील सेवा संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील अपात्र

पुढारी वृत्तसेवा

प्रयाग चिखली, पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील राजर्षी शाहू विकास सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि छत्रपती शाहू ग्रामीण पतसंस्थेचे विद्यमान संचालक विश्वास शामराव पाटील (माजी सरपंच) यांना सहकार खात्याने दोन्ही पदांवर काम करण्यास अपात्र ठरवल्याची माहिती येथील शाहू पतसंस्थेचे चेअरमन तसेच गटप्रमुख संजय (पी.डी.) पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना संजय पाटील म्हणाले की, येथील राजर्षी विकास सेवा संस्थेवर विद्यमान चेअरमन म्हणून विश्वास शामराव पाटील हे कार्यरत होते. त्यांना संस्थेकडील येणे कर्जाच्या थकबाकीच्या कारणावरून अपात्र ठरवले आहे. त्याचबरोबर विश्वास पाटील हे येथील छत्रपती शाहू पतसंस्थेचे देखील विद्यमान संचालक झाले. त्याचवेळी ते जय भवानी सहकारी दूध संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत होते. सहकारामध्ये कर्मचारी असलेल्या व्यक्तीला इतर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी पदी राहता येत नाही, असा आक्षेप काही महिन्यापूर्वी सहकार खात्याकडे नोंदवला गेला. त्यामुळे विश्वास पाटील यांना पतसंस्थेच्या संचालक पदावर काम करण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय करवीर सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांनी दिला.

या पत्रकार बैठकीस चेअरमन संजय पाटील यांच्यासह व्हा. चेअरमन ज्ञानदेव पाटील, संचालक संभाजी आंग्रे, नारायण कळंत्रे, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

दोन गटातील अपात्रता वॉर

दरम्यान, पाडळी बुद्रुक येथील दोन गटांतर्गत एकमेकांना अपात्र ठरवण्याची खेळी खेळली जात आहे काही महिन्यापूर्वी विश्वास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या गटातील काहींनी आक्षेप घेऊन पी. डी. पाटील गटातील दूध संस्थेचे तत्कालीन विद्यमान चेअरमन विलास पाटील यांच्यासह दोन संचालकांना अपात्र ठरवले होते. सध्या विश्वास पाटील यांना अपात्र ठरवून त्याचा वचपा पी. डी. पाटील गटांनी काढला आहे. त्यामुळे येथील राजकाणात नवीन व्टिस्ट निर्माण झाला आहे.

संस्थेमध्ये चुकीचा कारभार व भ्रष्टाचाराबाबत मी प्रश्न निर्माण केल्यामुळे तसेच निव्वळ राजकीय सूडबुद्धीने सहकारी कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेऊन माझ्या विरोधात रचलेल्या षडयंत्राविरोधात मी दाद मागितली आहे.
- विश्वास पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT