कोल्हापूर

कोल्हापूर : केंद्राकडून शहराला शंभर वातानुकूलित ई-बसेस

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून पीएम ई-बससेवा प्रकल्प सुरू असून त्याअंतर्गत शहराला 100 वातानुकूलित ई-बसेस मंजूर करून कोल्हापूरला दिवाळी भेट दिली असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. जानेवारीपर्यंत या बसेस रस्त्यावर धावतील, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर महापालिकेला ई- बसेस मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. संपूर्ण देशात 3 हजार 162, तर महाराष्ट्रासाठी 1 हजार 290 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार, राज्यातील निवडक शहरांमध्ये ई- बसेसची संख्या

निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शहराची गरज लक्षात घेऊन कोल्हापूरसाठी 100 ई- बसेस मंजूर करून घेतल्या. त्याचा आदेशही केंद्रीय मंत्रालयाने काढला आहे. जानेवारीपर्यंत या बसेस केएमटीच्या ताफ्यामध्ये येतील, असे सांगून ते म्हणाले, यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून, प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी माजी आ. अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT