निलजी येथील गोठ्याला आग लागून गोठा भस्मसात झाला. Pudhari Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : निलजी येथील गोठ्याला आग लागून तीन लाखांचे नुकसान

म्हैस दगावली

पुढारी वृत्तसेवा

नूल : निलजी (ता.गडहिंग्लज) येथील दूरदुंडी भीमगोंडा पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून तीन लाखांचे नुकसान झाले. गुरुवारी (दि.१३) रात्री आठच्या दरम्यान ही आग लागली. आगीत म्हैसीचा मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

पाटील यांचा जनावरांचा गोठा गावच्या पश्चिम दिशेकडील शेतवाडीत आहे. नेहमीप्रमाणे जनावरांचे दूध-चारापाणी करून घरी आल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ही आग लागल्याचे त्यांना समजले. आगीचे लोळ प्रचंड असल्याने गोठा क्षणात भस्मसात झाला. गोठ्यात एकूण पाच जनावरे होती. त्यापैकी एक जनावर आगीत भस्मसात झाले. आणखी तीन जनावरे शेजारील लोकांच्या दक्षतेने बाहेर काढण्यात यश आले परंतु तिही 80 टक्के भाजलेल्या अवस्थेत आहेत. यात एक रेडकू सुखरूप वाचले. या जनावरांबरोबर गोठ्यामध्ये चारा, शेती अवजारे, जळावू लाकूड भस्मसात झाले. आग विझवण्यासाठी गडहिंग्लज येथील अग्निशामक दलाच्या जवानांची मदत मिळाली.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल कुदळे, डॉ. श्रीनिवास वट्टमवार, मंडल अधिकारी अनंत छोले. राजू पाटील. तलाठी गोपाल खुपसे आदींनी भेट देऊन पंचनामा केला. पाटील यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यातच गोठ्याला लागलेल्या आग व जनावरांच्या नुकसानीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे अवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT