Crime News pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur Crime : महिलेच्या छळाला कंटाळून पेंटरने संपविले जीवन

कनाननगर येथील घटना; महिलेवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून एकत्र राहणाऱ्या महिलेने मारहाण केल्याच्या नैराश्यातून कनाननगर येथील पेंटरने मंगळवारी (दि. २२) रात्री जीवन संपविले. नितीन आकाराम बडेकर (वय ४३ रा. कनानगर, सावंत गल्ली, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जास्मिन सुतार (रा. कनाननगर) हिच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

पेंटिंग काम करणारा नितीन आईसोबत कनानगरात राहत होता. त्याचे परिसरातील जास्मिन सुतार हिच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. जास्मिन नितीनला वारंवार मानसिक त्रास देत होती. मंगळवारी सकाळी या दोघांमध्ये वाद होऊन जास्मिनने नितीनला मारहाण केली. याच नैराश्येतून नितीनने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

नितीनच्या कुटुंबीयांनी जास्मिनवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे मंगळवारी रात्री मृतदेह शवागारात ठेवला. बुधवारी सकाळी शाहूपुरी पोलिसांनी जास्मिनवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

रिल्स स्टारचा दबाव

जास्मिन सुतार हिची एक मैत्रीण सोशल मीडियावरील रिल्स स्टार आहे. जास्मिनविरोधात गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच त्या रिल्स स्टारने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. जास्मिनवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी तिने पोलिस ठाण्यात बुधवारी दिवसभर ठिय्या मांडून आकांडतांडवर केला. रात्री उशिरा एका पोलिस अधिकाऱ्यासोबत तिचा पोलिस ठाण्याच्या आवारातच शाब्दिक वाद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT