कोल्हापूर ःतीन पिढ्यांपासून वास्तव्य आहे... ब्ल्यू लाईनच्या आधी घर बांधले आहे... गुंठेवारी केली आहे... ग््राामपंचायतीकडून रितसर परवानगी घेतली आहे... घरफाळा भरतोय... आता महापालिकेत सामावून घ्या... घरे नियमित करा... अशी विनंती मसुटे मळा, निगडे मळ्यासह तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणधारकांनी मंगळवारी (दि. 26) सुनावणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना केली.
कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील 204 जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी 193 मिळकतधारक हजर होते. 11 मिळकतधारक गैरहजर राहिले. अतिरिक्त आयुक्त आडसूळ व उपायुक्त परितोष कंकाळ यांनी स्वतंत्रपणे नोटिसांच्या क्रमांकानुसार इनकॅमेरा सुनावणी घेतली. सर्वांनी लेखी म्हणणे सादर केले. महापालिका पॅनेलवरील ॲड. प्रशांत चिटणीस व ॲड. मुकुंद पवार उपस्थित होते. तसेच नगररचना विभागाचे 25 आणि इतर विभागांचे 25 असे एकूण 50 अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. मिळकतधारकांना बसण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता.
दरम्यान, सुनावणीसाठी एका मिळकतधारकाने वकिलाला आणले होते. त्यांनी महापालिकेला नोटीस काढण्याचा अधिकार नाही, आम्ही महापालिका हद्दीत नाही, ग््राामपंचायत हद्दीत आहोत. न्यायालयाने निकाल दिलेलाच नाही, असा युक्तिवाद केला.
महापालिकेच्या वकिलांनी त्यांना सर्व निकाल व कागदपत्रे दाखविली. तावडे हॉटेल परिसरातील उचगांव ग््राामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 22 एप्रिल रोजी दिला आहे. त्यानंतर महापालिकेने या जागेवरील बेकायदेशीर बांधकामांचा 24 व 25 एप्रिल रोजी सर्व्हे केला. येथे महापालिकेची 158 एकर जागा आहे. ट्रक टर्मिनससाठी 23.5 एकर जागार आरक्षित आहे. कचरा डेपोसाठी 11 एकर जागेवर आरक्षण आहे. उर्वरित जागेवर नो डेव्हलपमेंट झोन आहे, तरीही तेथे तब्बल 204 बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत. संबंधित बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. काही अतिक्रमणधारकांनी सर्किट बेंचमध्ये त्या नोटिसांना आव्हान दिले होते.