कोल्हापूर

Kolahpur News | शिरढोणमध्ये मिरवणूक मार्गावर ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!

गणेश मंडळांचा पुढाकार;कुरुंदवाड पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शितलकुमार डोईजड यांनी गणेश मंडळांच्या बैठकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिरढोण(ता. शिरोळ) येथील गणेशोत्सव तरुण मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेला बळ मिळणार आहे.

गणेशोत्सव काळात मिरवणूक मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत, तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवता यावे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे. एखादी घटना घडल्यास तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना उपलब्ध होणार आहे.

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तरुण मंडळांनी सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण २७ गावांमध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेलाही मदत होणार आहे.

"मिरवणुकीवर तिसऱ्या डोळ्याची नजर"

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचे योग्य नियोजन व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिरढोणमधील तरुण मंडळांनी मिरवणूक मार्गावर ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT